आज मज कुठे...

आमची प्रेरणा प्रा. डॉ.संतोष कुलकर्णी यांची सुरेख गझल   फार मी कुठे...

आज मज कुठे...

आज मज कुठे जावत नाही
काय बातमी दावत नाही

दोष आरशाला मी देतो...!
आरशात ज्या मावत नाही

भाग मागचा इतका सुजला
बोट त्यांस ही लावत नाही

ओरबाडते तीक्ष्ण नखाने
जवळ मज तिच्या जावत नाही

श्वान लागले मागे माझ्या...!
मी उगाच हा धावत नाही..!

घाबरू नको ह्या कुत्र्याला
फक्त भुंकते... चावत नाही...

काय मी करू ह्या "केश्या"ला
लाज काढतो... ठेवत नाही...

               -ई. केशवसुमार, मॅकल्सफिल्ड.