शेपूचे डाळवडे

  • चणाडाळ- २ वाट्या
  • उडीद डाळ-२ चमचे
  • १ कांदा (बारीक चिरुन)
  • शेपू बारीक चिरुन- अर्धी/पाऊण वाटी
  • मिरच्या आणि मीठ (दोन्ही चवीनुसार) ४ मिरच्या -मध्यम तिखट
  • तळण्यासाठी तेल
१५ मिनिटे
३-४

कृती:

१.प्रथम चणाडाळ आणि उडदाची डाळ ६ तास पाण्यात भिजत घालावी.

२.डाळी भिजल्यावर निथळून घेऊन त्यात मिरच्यांचे तुकडे,मीठ हवे असल्यास हळद घालावी व हे सर्व वाटणयंत्रातून (मिक्सर) कमीत कमी पाणी घालून किंचित भरड वाटून घ्यावे.

३.वाटलेल्या मिश्रणात बारीक चिरलेला शेपू व कांदा घालून नीट मिसळून घ्यावे.

४.वरील मिश्रणाची लहान भजी करून तळावी.

५.टोमॅटो सॉस किंवा नारळाच्या चटणी बरोबर गरम वाढावीत.

नावडती भाजी संपवण्याचा एक प्रकार!

मिश्रणात हवे असल्यास २-३ चमचे तांदळाचे पीठ घालावे.भजी जास्त कुरकुरीत होतील.

शेपू उग्र असेल तर १/२ वाटी अथवा ३/४ वाटी घ्यावा.

मैत्रीण