पहिला पाऊस पहिला पाऊस
हिरवी झाडी घननीळ आभाळ
हवेत गारवा घननीळ सागर
मनात मारवा-- १ हिरव्या पालवीत
पहिला पाऊस खुलतो गुलमोहोर--३
तृप्त धरणी पहिला पाऊस
हिरवं शिवार सरसर धारा
घरट्यात पक्षांच्या सळसळ वारा
ओला शहार-- २ पागोळ्यांच्या गाण्यात
झंकारल्या तारा----४