तोय

  • तूर डाळ - १ वाटी
  • तूप - एक चमचा
  • मोहरी - १/२ चमचा
  • हिंग - चिमूट्भर
  • सुक्या मिरच्या - २
  • मीठ - चवीपुरते
३० मिनिटे
दोघांसाठी

प्रथम तूर डाळ शिजवून घ्यावी. पाण्याचे प्रमाण थोडे जास्तच ठेवावे.

तूप गरम करून मोहरी, हिंग आणि सुक्या मिरच्यांची फोडणी करून डाळीला द्यावी.

चवीपुरते मीठ घालावे.

तोयीच्या फोडणीला कढीपत्तादेखील घालतात.

गरम गरम भाताबरोबर तोय घेताना वर लिंबू पिळून घ्यावे.

आई