तिच्या कांजण्यांचा मला त्रास होतो.

माफीचा साक्षीदार यांच्या 'तिच्या वागण्याचा मला त्रास होतो' या कवितेचे हे विडंबन आहे.मूळ कवितेचा दुवा देण्याचे कष्ट टाळले आहेत.

मनोगत वर तसे बरेच ताकदीचे विडंबनकार आहेत, पण म्हंटलं आपणही एक प्रयत्न करून बघावा.जमलं तर जमलं!

            तिच्या कांजण्यांचा मला त्रास होतो

          मलाही झाल्याचा खुळा भास होतो

          जवळ जरी तिच्या मी न कधी गेलो

          या रोगाचा मलाच का त्रास होतो?

मूळ कविता करण्यापेक्षा तिचं विडंबन करणं अधिक सोपं असं मला वाटतं. आणि विडंबनं अधिक चवीने वाचली जातात हे जरी खऱं असलं

तरी मूळ कवितेचं मूल्य कमी होत नाहीच! कवितेतल्या वृत्तांबाबत अधिक जाणून घ्यायला आवडेल.