मॉरिशसात सकाळ!

वा! काय बातमी आहे पण!

मला वाटते सकाळ हे भारतातले पहिलेच वृत्तपत्र असावे की ज्याची परदेशातून आवृत्ती निघाली आहे? चूक भूल द्यावी घ्यावी.

सगळ्यांना वाचता यावी आणि विचारांची देवाणघेवाण करता यावी या हेतूने ती बातमी येथे उतरवली आहे.

"सकाळ एनआयई"च्या मॉरिशस आवृत्तीचे आज प्रकाशन

पुणे, ता. १० - "सकाळ एनआयई' मॉरिशस आवृत्तीचे प्रकाशन आज (ता. ११) होत आहे. मॉरिशस येथील मराठी साहित्य परिषद संचालित शाळांमधील कौतुक समारंभात मॉरिशसच्या शिक्षण मंत्रालयाच्या विशेष अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रकाशन समारंभ होत आहे... 
अंक डाऊनलोड करण्यासाठी इथे क्‍लिक करा
"सकाळ सोशल फाउंडेशन'च्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या अनेक उपक्रमांपैकी "एनआयई' (न्यूजपेपर इन एज्युकेशन) हा एक उपक्रम आहे. महाराष्ट्रातील तीस हजार विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेत आहेत.

गेल्या वर्षी "सकाळ एनआयई'च्या काही विद्यार्थ्यांनी मॉरिशसमधील विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. याचाच पुढचा टप्पा म्हणून तेथील विद्यार्थ्यांनी केलेल्या लिखाणावर व काढलेल्या चित्रांवर आधारित हा अंक तयार करण्यात आला आहे.

मॉरिशसमधील "मराठी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन'च्या वरिष्ठ निरीक्षक श्रीमती सजनी सुखु व सहशिक्षिका सरस्वतीबाई कहनिया यांनी मुलांशी "एनआयई'बाबत साधलेल्या संवादातून मुलांचे लेखन केले आहे. "सकाळ एनआयई'चे परभणीचे समन्वयक संदीप देऊळगावकर यांच्या कल्पनेतून हा अंक तयार झाला आहे.

या अंकाच्या निमित्ताने मॉरिशसमधील मराठी भाषक मुलांच्या भावना अंकरूपाने "एनआयई'मार्फत पोचविल्या जात आहेत. या अंकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यांतील विविध शाळांमधील मुलांबरोबर मुलाखत, पत्रलेखन, छंद, विज्ञान, जलसंवर्धन, मूकमैत्री, या व अशा विविध विषयांवर १५० प्रशिक्षित महाविद्यालयीन तरुण संवाद साधतात. वर्षातून दोन वेळा त्यांच्यासाठी स्वतंत्र वर्तमानपत्र काढले जाते. विविध जाणिवा जागृत करीत विद्यार्थी दशेतच वृत्तपत्र वाचनाची आवड जोपासण्याच्या हेतूने "सकाळ सोशल फाउंडेशन' हा उपक्रम राबवीत आहे.

"सकाळ एनआयई' या सामाजिक शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून सहावी व सातवीच्या तीस हजार मुलांसाठी विविध विधायक कार्यक्रम घेतले जातात. दत्तक पालक प्रायोजक योजनेच्या माध्यमातून आर्थिक योगदानातून आपणही सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीसाठी - nie@esakal.com
संपर्क - ०२० -२४४०५८९१,२४४०५८९२