योग्य निर्णय कोणता ?

     बुधिया सिंग या लहान मुलाला मॅरेथॉन शर्यतीत पळवून प्रसिद्धी मिळवण्यात त्याच्या पालकांचा दृष्टीकोन चुकीचा आहे पण त्याच्या अंगचा हा गुण ओळखून त्याला योग्य प्रशिक्षण दिल्यास तो उत्कृष्ट धावपटू होईल असे त्याच्या प्रशिक्षकाचे  मत आहे आणि तो बुधियासिंगकडून जास्त मेहेनत करून घेतो.पण तो आपल्याला  त्रास देतो असे  बुधियाला वाटते आणि त्याला त्याचा विरोध आहे.
      अमेरिकेतून आलेल्या काही पालकानी येथील शाळांमधून   घोकंपट्टीयुक्त  अशा शिक्षणपद्धतीमध्ये आपल्या पाल्याला भरडून न काढता ज्या शाळेत ठराविक अभ्यासक्रम नाही अशा काही शाळा भारतात निघाल्या आहेत त्यात घालणे पसंत केले.किंवा काही पालकांनी तर त्याना घरीच शिक्षण द्यायचा निर्णय घेतलाय.ती मुले स्वतंत्र बुद्धीने आपला मार्ग काढतील. ती मुले नेहमीच्या चाकोरीबद्ध अभ्यासक्रमात गुंतणार नाहीत. पण त्याचमुळे ही मुले डॉक्टर, इंजिनिअर असे काही होतीलच असे नाही.
      रविंद्रनाथ टागोर (ठाकूर) यानी चाकोरीबद्ध शिक्षणक्रमात रस न घेतल्याने त्यांच्या वडिलांनी त्यांना घरीच शिक्षण दिले. 
      यापूर्वी डॉ. अनिल अवचट यानी आपल्या मुलींना पालिकेच्या शाळेत घातले होते      
          मुलांच्या बाबतीत कोणते निर्णय घ्यायचे याविषयी पालकासच विचार करावा लागणार,पण कोणता निर्णय योग्य ठरेल हे ठरवणे अवघड नाही का? त्यामुळेच शेवटी चाकोरीबद्ध शिक्षणक्रमातच आपल्या पाल्याला गुंतवण्याचा कमी धोक्याचा निर्णय पालक घेतात आणि त्यामुळे मुलाच्या उपजत गुणांचा विकास खुंटण्याचाही धोका संभवतो नाही का ? मनोगती जागृत पालकांना काय वाटते?