प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी यांच्या '...मित्रा' या गझलेला घरचा आहेर....
कसे तुझे हे इमान बेट्या..!
बघून सारे गुमान बेट्या...!
(वटारता मी उगाच डोळे,
भिजून गेली तुमान बेट्या...)
तुला दिली मी, तशी कुणाला
मिळो न संधी समान, बेट्या..
तुला मुलांचाच धाक वाटे..!
..पिढ्यापिढ्यांना जुमान, बेट्या..!
तुझा करंटा विचार कैसा..
...'..पतंग म्हणजे विमान...?', बेट्या ..!
कणा तुझा ताठ नेमका, पण -
खुजी मनाची कमान, बेट्या..
तुला जनाची न लाज कांही..
..असो मनाची किमान, बेट्या....
प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर