बटाट्याचे डांगर

  • १ मोठा बटाटा
  • लाल तिखट २ चमचे, जिरे पावडर पाऊण चमचा,
  • साजूक तूप ६-७ चमचे, साबुदाणा पीठ १० चमचे,
  • मीठ चवीपुरते
१५ मिनिटे
२ जण

बटाटा कूकरमध्ये उकडून घ्या. गार झाल्यावर साले काढून त्यात लाल तिखट, जिरे पावडर, साबुदाणा पीठ, व मीठ घालून खलबत्त्यात कूट कूट कूटा. खलबत्ता नसेल तर फूड प्रोसेसरमध्ये एकजीव करा. कुटून झाल्यावर तूप लावून थोडे हाताने एकसारखे करा. कूटतानाही अधून मधून थोडे तूप घालावे म्हणजे एकजीव होण्याकरता मदत होते. आणि खा. खूप मस्त व चविष्ट लागते. तोंडाला चव येते. डांगर नुसते खाताना साजूक तूप भरपूर घ्यावे.

हे डांगर उपासाला चालते. ह्या डांगराचे  पापड अथवा मिरगुंड  करा. हे डांगर खूप कुटल्यामुळे पापड खूप हलके फुलके होतात. पापड तळून अथवा भाजुनही छान लागतो. पापड/मिरगुंडा बरोबर भाजके दाणे मस्त लागतात.

सौ आई