लंडनमध्ये आनंदाचं गांव!

महाराष्ट्र मंडळ लंडनच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये 'आनंदाचं गांव ' हा माझ्या कवितांच्या कार्यक्रम सादर करायची संधी मला मिळाली आहे!

कार्यक्रमाचा तपशील असा:

आनंदाचं गांव...
हलक्या फुलक्या कवितांची आगळी वेगळी मैफील...

दिवस: शनिवार, दिनांक २ सप्टेंबर
वेळ: सकाळी ११.१५ वाजता
स्थळ: Victoria Hall, Ealing Council, 14/16 Uxbridge Road , Ealing W5 2HL

विशेष म्हणजे 'आनंदाचं गांव' चा पहिला प्रयोग महाराष्ट्र मंडळ लंडनमध्येच ४ सप्टेंबर २००२ ला झाला होता! आणि आता बरोबर ५ वर्षांनंतर लंडनमधला पाचवा (एकूणात १५ वा) प्रयोग तिथेच होत आहे! सर्वांना सस्नेह निमंत्रण !

(कार्यक्रमास प्रवेशमूल्य आहे... अधिक माहितीसाठी महाराष्ट्र मंडळाची वेबसाईट पहावी )

कार्यक्रमाच्या संकल्पनेविषयी अधिक माहिती येथे आहे