शुद्धलेखनाआधी शुद्ध उच्चार

पुणे, ता. २३ - ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांचा सहभाग असणारे "शुद्धलेखनाआधी शुद्ध उच्चार' हे "बालचित्रवाणी'निर्मित तीन भाग २७ ते २९ ऑगस्टदरम्यान दुपारी बारा ते साडेबारा या वेळात सह्याद्री वाहिनीवरून दाखवण्यात येणार आहेत, अशी माहिती "बालचित्रवाणी'चे केशव साठे यांनी दिली. ......
शुद्धलेखनासाठी आधी उच्चार शुद्ध असण्याची गरज आहे. जे उच्चारले जाते तेच लेखनातून उतरते, या सूत्रावर आधारित या कार्यक्रमात डॉ. वैद्य यांच्यासह अरुण फडके आणि डॉ. यास्मिन शेख या व्याकरणतज्ज्ञांचाही सहभाग आहे. रोजच्या भाषाव्यवहारातील अनेक उदाहरणांसह या तज्ज्ञांनी हा विषय मांडला आहे. सूत्रसंचालन डॉ. मानसी मागीकर यांचे आहे. निर्मिती- दिग्दर्शन अरुण काकतकर यांचे आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांनीही जरूर पाहावेत, असे मार्गदर्शन यात असल्याचे साठे यांनी सांगितले.

संदर्भ ईसकाळतली बातमी : 'शुद्धलेखनाआधी शुद्ध उच्चार' २७ ऑगस्टपासून सह्याद्री'वर