ऐश्वर्याची मंगळागौर!

नवीन लग्न झालेल्या ललनांची पहिली मंगळागौर चांगलीच रंगात आलीये .. ऐश्वर्याच्या आईच्या आग्रहाखातर तिची मंगळागौर बच्चन मंडळींनी धुमधडाक्यात साजरी केली . या ' स्टार मंगळागौरी ' ला बॉलीवुडचं अवघं तारांगण अवतरलं , सोबत अमरचाचा होतेच . मग खेळ , फुगड्या , उखाणे यांनी जी धमाल आली , ती काय वर्णावी ... ?

महाराष्ट्राच्या मातीत आपण वाढलो असल्याने आपल्या ऐश्वर्याची या श्रावणात मंगळागौर मोठी धुमधडाक्यात करायची इच्छा तिची आई वृंदा राय यांनी बच्चन कुटुंबियांजवळ व्यक्त केली . त्यांच्यात आपापसात यावर साधक बाधक चर्चा झाली आणि मा . अमरसिंहानी निर्णय जाहीर केला , '' मंगळागौर होईल पण सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ती बच्चन साहेबांच्या बंगल्यातच होईल . '' त्यावर राय पटकन बोलून गेल्या .
अग बाई , हे पण असणार ? मग येणाऱ्या नट्यांच्या सुरक्षेचा प्रश्न तसाच राहणार .. वेळ कमी असल्याने सर्वांना मोबाइल , एस . एम . एस . करूनच मंगळा गौरीची आमंत्रण गेली . बायकांची ' फुलनाईट ' पाटीर् असणार असे समजून अनेक जणी तयारीने आल्या होत्या . पाटीर्चा ड्रेसकोड होता हिरवी साडी . ब्लाऊजचे रंग कुठलेही असले तरी चालतील पण घाला असा आदेश जया बच्चन बाईंनी काढला नाहीतर उगीच माझ्याकडे किनई त्या रंगाचा ब्लाऊजच नाहीये हे निमित्त नको ..

जसजशा हिरॉईन्स जमू लागल्या , राय व बच्चन यांनी ऐश्वर्या अभिषेक बच्चन यांना पुढे घेऊन मंगळागौर पूजन उरकले म्हणजे सगळ्या नाचायला मोकळ्या . अभिषेक नवाकोरा कुर्ता पायजमा घालून कौतुकाने मिरवत होता . अमिताभजी प्रत्येकीं जातीने स्वागत करत होते व अमरसिंहजी प्रत्येकीला हात धरून आतपर्यंत आणून सोडत होते ..

सोनाली बेन्द्रे - बहलला लवकर जायचं असल्याने फुगड्या , झिम्मा , पिंगा उखाणे वगैरे खेळांना सुरुवात झाली . ' मद्य ' भागी अर्थातच अमरसिंह . सोनाली निघाली तशी सर्वांनी उखाणा घेण्यासाठी आग्रह धरला ..

सोनाली :
पडद्यावर दिसत नसले तरी ,
बसले नाही स्वयंपाक करत ..
सांभाळून रहा सगळ्या जणी ,
लवकरच येतेय मी परत ..

कैतरीनाला त्यातलं निटसं काही कळलं नाही , तशी ती म्हणाली , '' परत येतेय तर ही जातेयच कशाला ?'' मग सर्वांनी कैतरीनाला आग्रह केला ..
कैतरीना :
मंगळाची कृपा म्हणून ,
तुला अभिषेक मिळाला .
तू झालीस बाजूला तेव्हाच ,
सलमान लागला गळाला ..

सर्व धामधुमीत अमितजी आपली लेटेस्ट हिरॉइन तब्बू बरोबर फुगडी घालत होते . त्यांना थांबवून सर्वांनी तब्बूला उखाण्याचा आग्रह केला ..

तब्बू :
सासऱ्यांबरोबर तुझ्या ,
पिक्चर केलाय मी ' चिनीकम '.
कसले हॅण्डसम आहेत सांगू ,
आत्तापर्यंतचे सगळे ' पानीकम '.

हे ऐकून ऐश्वर्या एक दीर्घ उसासा सोडत मनात म्हणाली त्यांच्याकडे पाहूनच तर अभिषेकशी लग्न केलंय . सर्वांनी मग श्रीदेवी मोर्चा वळवला ..

श्रीदेवी :
अनिलची मी हिरॉइन ,
पण बोनीचे पटकावली
पहिल्या बायकोला त्याच्या
मी कमरेला लटकावली ..

श्रीदेवी व शाहरूखची पत्नी गौरी खान गप्पा मारत होत्या .. श्रीदेवी म्हणाली , किती योगायोगाची गोष्ट आहे , माझी मंगळागौर सुद्धा ट्यूसडे लाच झाली होती . ' यावर गौरी खान ' ने आमच्यात हे असले सगळे प्रकार शक्यतो शुक्रवारीच होतात अशी माहिती पुरवली . मग गौरीला सर्वांनी गळ घातली ..

गौरी :
आमच्या मुंबईत वाढलेय मी ,
मला सपोर्ट आहे माहेरचा .
क ... क ... किरण केल्यावर ,
त्यांना रस्ता दाखवते बाहेरचा ..

करीना कपूरने कशासाठीतरी अभिषेकला हाक मारताना चुकून ' जीजू ' म्हटलं . ते ऐकून स्तंभीत झालेल्यांनी करीनाला उखाणा घ्यायला लावला ..

करीना :
बहू शोधण्यासाठी अमितचाचांनी
लावला लांबचा चष्मा
म्हणूनच इतक्या जवळ असूनही
दिसली नाही ' करिष्मा '.

भाजपच्या खासदारीण बाई हेमा मालिनी यांना समाजवादी पक्षाच्या खासदारीण बाई जयाबच्चन यांनी आग्रह केला तेव्हा बच्चन साहेबांकडे एक तिरपा चोरटा कटाक्ष टाकत त्यांनी उखाणा घेतला ..

हेमामालिनी :
बागबान के सेट पर की बात ,
मै किसी को नही बताऊंगी .
जब तक है जान ,
जाने जहाँ मै नाचूंगी ....

असे म्हणून पुन्हा त्या जोशात नाचू लागल्या . सर्व हिरॉइन्स , अभिषेक अमरसिंह व अमितजी देखील त्यांच्या सोबत नाचत होते आणि इतक्यात गरम धरमजींचा तो कर्णकर्कश डायलॉग जोरात ऐकू आला . '' बसंती , इन कुत्तों के सामने मत नाचना ! '' ते ऐकून सर्वजण एका क्षणात स्तब्ध झाले .. सर्वांच्या चेहऱ्यावर भिती मिश्रीत चिंता होती . अमरसिंह मात्र अपमानामुळे संतापून थरथरत होते . तेवढ्यात कोणाचे तरी लक्ष गेले . अमरसिंहांच्याच धाकट्या कार्ट्याने शेजारच्या खोलीत ' शोले ' ची डीव्हीडी डॉल्बीवर लावली होती . त्यात नेमका तो सिन तिथे आला त्याला तो तरी काय करणार पण अमरसिंहाची त्यालाच थोबडावून खालच्या मजल्यावर खेळायला पाठवून दिले .. सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला व आता अमरसिंहानाच आग्रह केला ..

अमरसिंह :
बस फुगडी खेळून ,
माझे गुडघेसुद्धा लागलेत दुखू ..
मैत्रीच्या ओझ्याखाली ,
बच्चनसाहेब मात्र लागलेत वाकू .

आपण वाकलो नाहीत हे दाखवण्यासाठी बच्चनसाहेब आणखी जोरात फुगड्या घालू लागले . तेव्हा न राहवून जया बच्चन म्हणाल्या ,

जया बच्चन :
थकून जाल नाचून ,
जरा आता ... थोडा दम खा
स्टॅमिना ठेवा राखून
यायचीय अजून रेखा

ही मिर्ची जरा अमितजींना जास्तच लागली आणि त्यांनीही लगेच टोला हाणला ..

अमिताभजी :
जयाच्या राजकीय कारकिदीर्वर ,
अमरसिंहचा पहारा ..
सुटलोय सगळ्या भानगडींतून ,
आता नकोसा झालाय ' सहारा '

जया बच्चनने परिस्थिती काबूत आणण्यासाठी अभिषेकला पुढे केले ..

अभिषेक ( लाजत ) :
एवढ्या भरल्या संसारात ,
आता एकच राहिल्येय उणीव ..
नातवंडे आल्याशिवाय यांना ,
वयाची होणार नाही जाणीव ..

याला आता ऐश्वर्या काय उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते ..

ऐश्वर्या :

पती - पत्नीचं नातं आहे आता ,
नट - नटी नाही आहोत आपण .
आणखी थोडासा धीर धर ,
वी आर सेलिब्रेटिंग श्रावण।

अशी साजरी झाली आपल्या ऐश्वर्याची मंगळागौर !

(टीप: एका इ-मेलमधून आलेला मजकूर कानामात्राउकारवेलांटीचाही फरक न करता इथे जसाच्या तसा चिकटवला आहे. लेखन माझे नाही त्यामुळे श्रेयही माझे नसेल. अर्थात पोस्टमन म्हणून काम केल्याबद्दल पोस्तरूपी श्रेय दिल्यास हरकत नाही  . लेखन बरेच थैल्लर्यपूर्ण(कर्टसी: दिगंभा... भारीच आवडला हा शब्द) आहे आणि अमराठी शब्द आणि नावेही बरीच सापडतील. तरी उदार अंतःकरणाने मज पामरीचे हे अपराध पोटात घालावेत ही विनंती.
--अदिती)