ऑफिसमध्ये येतोय न येतोय तोवर २-३ वेळा ऍशचा मिसकॉल आलेला असतो.
परत मोबाइल ऍश कॉलींग चा मेसेज दाखवु लागतो. घाबरु नको.. अणि गोड गैरसमज पण नको, ऍश .. माझी मैत्रीण.. जराशी बर्यापैकी आशीच.
बोलणे तर बघाल...
मी "हॅलो.."
तिकडुन "हं...." (आता हं म्हणजे काय?)
मी "बोल ना......"
तिकडुन "हं..." (किटकिटच आहे)
मी.. "आशी...... बोल ना...."
तिकडुन "काय..?? "
मी.. "काय म्हणजे..?? "
परत मीच .." काय करतेस (आशी म्हशी)?"
तिकडुन "गप्पे.... (ठणाणा...)"
तिकडुन " काल्या..... तु ना... "
मी "काय .. मी काय?"
तिकडुन "तुला काय वाटतं की नाही... "
मग मी "... मला कसं काय वाटेल .. जे वाटायचं ते ... आम्याला वाटायला हवं ना..."
तिकडुन " गप्पे ...काल्या नाला..? (परत ठणाणा) "
तिकडुन " असुदेत काल्या मला माहितेय किती काम करतोस तु ..(सपशेल हार ) "
मी "मग!!! नवरा काय म्हणतो... कॉल केलेलीस का? "
तिकडुन " सगळे सारखेच!!(जर त्यांच्यात भांडाभांडी झाली असेल तर ) मग... सकाळीच केला..(ह्याचा अर्थ सगळं ठिक आहे म्हणायचं) .. तो तर ना फार कामात आहे बिचारा... (आज जरा जास्तच उतू चाललय ...) .. (हसुन) आत्ताच भांडुन ठेवलाय (म्हणजे हीनेच भांडणे काढलेत आणि त्याने ठीक आहे घे म्हटलाय!! )"
मग मी "बर..."
(ह्याचा अर्थ हा.. की मी समोर काहीतरी काम करतोय .. इम्पॉर्टंट तेच...)
मग तिकडुन " काल्या ... काम कर... उगाच पण मला फोन लावायचा आणि बर .बर .करत बसायचं..."
मग मी.. " म्हशी.... मी फोन लावलाय तुला काय करायचंय .. ?? "
मग मीच " चल बाय .. (मला पण काही किमत आहे की नाही!)"
लगेच तिकडुन "आय ..काय झालं(म्हणजे काय ? )"
मग मीच " आजपासुन मी तुला फोन करणार नाही आणि तु पण मला फोन करु नकोस .. समजलीस...?"
धाड...!!(एकदाच ऐकु येते.. )
मग आणखी थोड्यावेळाने...
परत मोबाइल मेसेज दाखवु लागतो .. ऍश कॉलींग...
मग मी "हं..." :)