बाळज्योत

बाळज्योत
जगतांना स्मरले
हरवलेले काही
उरामध्ये हलली
हुरहूर सावली!

चुकले काही डाव
हरले काही डाव
आता मागे राहिला
सल कशाला बाई?

रेशम भरलेली
रात्र चमकतांना
निमूट राहिलेले 
आयुष्य विस्कटले

तुटतुटले धागे..
काटेरी जीवनाचे
माळावर उदास
इंधन जळणारे

पारदर्शक अंधार
दूर करुन फुलले
बाभुळफूल एक
हळूच हसणारे!