बाप

मी ऑम्लेट खात होतो, दुपारची वेळ होती. होटेलमध्ये ठीक-ठाक गर्दी होती. मला कामावर जायची घाई होती. आधीच भूक लागलेली, त्यात आमची थाळी यायला उशीर लागत होता. माझ्या सोबत्याच जेवण चालू झालेल होत, त्यामुळे मला अजूनच घाई लागलेली.
मी थाळी घेण्याच्या ठीकाणी असलेल्या गर्दीत आतला (स्वयंपाकघर्नामक पदार्थाचा) पसारा पहात होतो. काही काम्गार मजूर लोकही तिथे आले होते. त्यतला एक जरा भडकलेला वाटला. दाढी वाढलेली,केस अस्ताव्यस्त. तोही घाईत असावा. आल्या आल्या त्याने हॉटेलवाल्याला "लवकर मिळेल का" अशी खास माझ्यासारखी उतावळी माणस विचारतात तशी विचारणा केली. त्याला मिसळ सोबत जास्त पाव हवे होते, आणि  बहुतेक हॉटेल्वाला देत न्व्हता.(अस मला वाटल नक्की काय भानगड होती ते माहीत नाही- मी "संगणक तत्रद्यान व्यवसायिकातला"ना! एका  हॉटेल्वाल्याच काम्गाराशी चाललेल भांडण फ़क्त गम्मत म्हणूनच ऐकणार!) कामावरचा पोर्या म्हणत होता "आता आमच्याकडले पाव संपलेत"-- हा कामगार म्हणाला "बेकरीतले पाव संपले का?" 
मी आपली थाळी घेउन निघालो. जेवण संपल तो दाढीवाला बाबाही मिसळ आणि  पाव पुडक्यात घालून गेला. माझ्या सहक्र्यासोबत मी माझ्या कचेरीकडे चालत चालत निघालो. रस्तयावर फूल,खेळणी विकणारे एका वाहतूक दिव्याजवळ(traffic signal) झाडाच्या सावलीत उभे होते.एक पूरण कुटूंबच. त्याच कुटुंबाचा प्र्मुख तो दाढीवाल होता.तिथे झाडाच्या सावलीत त्यची (बहुतेक करून)बायको आप्ल्या मुलांना खाऊ घालत होती आणि   एक एक पाव आप्ल्या दोन तीन मुलांना ती तोडून तोडून भरवत होती......
मी रोज त्याच रस्त्यावरून कचेरीत ये-जा करतो.
आजही त्या दिव्याजवळ गाडी थांबवली की मी ते कुटुंब बघतो.
आणि  मला त्या बापाचा अभिमानवाटतो..
"यहां 'दूध', 'दूध' वे बच्चे कब्र मे भी चिल्लाते हैं !
   यहां वे भी है जो दूध्से कुत्तो को नहलाते है!!"