येथून जाताना कीर्ती मागे उरावी .कैसी ?

येथून जाताना कीर्ती मागे उरावी,असे प्रत्येकला वाटते.त्यासाठी काय करावे,याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन कोठे आहे,असे दिसत नाही.मात्र इतिहासांत डोकावले तर

अनेक माणसांची नावे वाचायला मिळतात.त्यानी त्यांच्या आयुष्यात काय काय केले ,याचे तपशील वाचल्यावर लक्षात येते की चांगले किंवा वाइट यापैकी कोणत्याही प्रकारचे आचरण केले तरी इतिहासात नाव राहून जाते.मग आपण काय करावे ?वाइट कामाबद्दल ज्यांचे नाव घेतले जाते,त्यानी सुद्धा जे केलेले आहे,ते करताना त्याना चांगलेच वाटलेले होते.म्हणजे कृत्य हे सापेक्ष असते.एकच कृत्य ,एकाच्या दृष्टीतून चांगले तर दुसर्याचे दृष्टीने वाइट असते.उदा:-इस्ट इंडिया कंपनीने भारतातजे केले ते भारतीयांच्यादृटीने वाइट ठरते पण ब्रिटिशांच्या नजरेतून पराक्रमाचे ठरते.यामुळे सर्व सामान्य माणसाना प्रश्न पडतो की जगावे तर कसे जगावे ?

यावरचे उत्तर आहे,भगवद्गीता ,जी भगवान श्रीकृष्णांनी  अर्जूनाला सांगितली होती. गीतेमध्ये  सांग़ीतले आहे, माणसाने फ़क्त कर्म करावे,फ़ळांची आशा करू नये.काम करत जावे.ते वाइट कि चांगले याचा विचार करूनये.किती सोपे आहे जगणे ! आहे की नाही ?