एकटी बाग
बागेत साग
सागाशेजारी तळे
तळ्यांत कमळे
कमळाचा रंग
रंगात दंग
दंगलेली मी
माझ्याभोवती बाग
..एकटी बाग
बागेत नाग
नागाचे डोळे
डोळे की गोळे
गोळ्यांत मी
मला फुटलाय घाम
घामाचा वास
वासाची आस..
एकटी बाग
माझ्यासमोर नाग
समोरच कमळे
वासनाधीन डोळे
अहा तो कोण
राजकुमार
त्याला पाहून
नागोबा पसार
-- ऋषिकेश