अनुत्तरित

कसे कोणात गुंतत जातो

आपले आपल्यालाच कळत नाही,

आणि रेशमी लडी सोडवताना

दुखल्यावाचून राहत नाही.

एकत्र पाहून विसरून जायला

स्वप्न म्हणजे सिनेमा नाही,

आणि हे समजून दु:खी व्हायला

कोणीच कसे तयार नाही?

काठावर बसून पोहणे

कसे आपल्याला जमत नाही?

स्वतःला सांभाळून प्रेम करणे

आपल्यालाच कसे जमत नाही?

खरे कधीच वाटत नाही

खरे "कारण" कधीच  का सापडत नाही?

"वास्तव वादी" विचार करणे

खरेच का जमत नाही?