मृत्यू अटळ आहे...

एका घनदाट अरण्यात.. दररोज सकाळी.. एक हरण जागं होतं.. उठताक्षणी त्या हरणाच्या मनात एकच विचार येतो.. एकच लक्ष्य असतं... की आज आपल्याला सगळ्यात जलद वेगाने धावणाऱ्या सिंहापेक्षा वेगात पळता आलं पाहिजे.. जर मी हे करू शकलो नाही तर त्या सिंहाकडून आपला मृत्यू अटळ आहे...

एका घनदाट अरण्यात.. दररोज सकाळी.. एक सिंह जागा होतो.. उठताक्षणी त्या सिंहाच्या मनात एकच विचार येतो.. एकच लक्ष्य असतं... की आज आपल्याला सगळ्यात हळू वेगाने धावणाऱ्या हरणापेक्षा वेगात पळता आलं पाहिजे.. जर मी हे करू शकलो नाही तर भुकेमुळे आपला मृत्यू अटळ आहे...

तात्पर्य.. तुम्ही हरण असा नाहीतर सिंह.. जगण्यासाठी सतत तुम्हाला उगवत्या सूर्याबरोबर पळत रहाणं गरजेचं आहे.. आणि तेही कालच्या पेक्षा अधिक वेगाने.. नाहीतर या आयुष्याच्या जीवघेण्या स्पर्धेत तुमचा मृत्यू अटळ आहे...

(मूळ लेखक माहित नाही. हे स्वैर भाषांतर आहे)