मक्याचा उपमा

  • ४ मक्याची कणसे
  • फोडणीचे साहित्य, मीठ , साखर
  • १ वाटी खोबरे, कोथिंबीर.
  • तेल
  • हिरव्या मिरच्या (बारिक तुकडे करून) व कढीपत्ता, काजु तुकडे
३० मिनिटे
चार जणांसाठी.

मक्याची कणसे किसून घ्यावी. कढईत तेल तापवून घ्यावे. त्यात फोडणी करून मिरच्यांचे तुकडे व कढिपत्ता, काजू तुकडे घालावेत. नंतर मक्याचा कीस घालून आवडीप्रमाणे मीठ व साखर घालून ढवळून एक वाफ आणावी. वाढून घेताना त्यावर ओले खोबरे व कोथिंबीर पसरावी. गरम खाण्यातच मजा आहे. नक्की आवडेल.

हा पदार्थ फक्त ताजाच खावा.

स्व:ताच करून बघितले.