आयत्या बिळावर नागोबा: राष्ट्रवादीचा क्रिकेट रोड शो

सर्व प्रथम २०-२० विश्वचषक खेचून आणणाऱ्या धोनी संघाचे अभिनंदन अ त्याचबरोबर खेळाचा खेळखंडोबा करणाऱ्या "पवारसाहेबांच्या" राष्ट्रवादीचेही अभिनंदन

पण बरेच झाले, यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये हमखास यशाचा "formula" सापडला.

पवारसाहेबांकडे क्रीडासमितीचे अध्यक्षपद द्या, मग पहा त्यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रोत्साहनामुळे भारत कसा जिंकतो ते !!!! काही गरज नाही परदेशी प्रशीक्षकाची, खेळांच्या सुवीधा व नवतरुणांना संधी वगैरे देण्याची, एकटे पवारसाहेब समर्थ आहेत त्यासाठी.

तुम्हाला काय वाटले " धोनीची रणनीती, युवीची धुवांधार फलंदाजी, रोहीतची संयमी खेळी, पठाण, R. P. , कार्तीकची नियंत्रीत गोलंदाजी यामुळे कुठे कप जिंकता येतो?

चल हट बे..... तिथे पाहिजे पवार्साहेबांची प्रेरणा, प्रोत्साहन. आम्हाला मुळी माहीतच नव्हते....... खेळाचे तज्ञ अनावश्यक चर्चांमध्ये timepass करत होते. त्याना कुठे यातील गोम माहीत होती.

पण यासर्व गोष्टींची आम्हा पामरांना जाणीव करुन देणाऱ्या महाराष्ट्राचे मा. उपमुख्यमंत्री आर. आर. आबा यांचे शतषः धन्यवाद

त्याच्याच भाषेत सांगायचे झालेतर महापराक्रमी "शिवबांचा", भगवा अटकेपार फडकवणाऱ्या पेशव्यांचा, हजारो स्वातंत्रसैनिकांचा तसेच पराक्रमी मराठ्यांचा महाराष्ट्र आज "लाचारी, हुजरी व संधीसधूपणात " सुध्धा मागे नाही हे दाखवुन दिल्याबद्दल आर. आर. आबांचे अभिनंदन. याउपर थोडीसुध्धा लाज न वाटता निर्लज्जपणे त्याचे समर्थन करणाऱ्या आबांना दोन्ही हात जोडुन प्रणाम. चांगलेच झाले एकारितीने, यामुळे लोकांनातरी कल्पना येईल या नेत्यांच्या संधीसाधुपणाची [????????]

विश्वविजेत्यांच्या "विजयरथा" वर मिरवणाऱ्या मा. सचीन अहीर व जितेंद्र आव्हाड यांचेही अभिनंदन. आज कालचा "नाग व बिळ" दुर्मिळ झालेल्या जमान्यात "आयत्या बिळावर नागोबा" म्हणीचे फुकट प्रत्यक्षिक दाखविलयाबद्दल त्यांचेही आभार.

बोला " पवारसाहेकी जय................"