स्वतःशी संसार ।
आनंद अपार ।
नाही दुजा थार ।
जिण्याविण ॥१॥
स्वतःशी बोलणे ।
स्वतःचे ऐकणे ।
स्वतःचेच गाणे ।
एकतारी ।।२॥
कायेचे उधाण ।
वाचेचे आव्हान ।
मना नित्य जाण ।
माया सारी ॥३॥
उत्पत्तीचा सोस ।
स्थितीचा विलास ।
उकळे विरस ।
लयाचा ॥४॥
-- अभय अरुण इनामदार.