खुसखुशीत शंकरपाळी

  • मैदा -१किलो
  • तुप - ३/४ किलो
  • साखर - १/४ -१/२ किलो
  • पाणी / दुध - १ मोठी वाटी
१ तास
४-५ जणांना

१ मोठी वाटी पाणी / दुध , १ मोठी वाटी साखर , १ मोठी वाटी तुप  या गोष्टी पातेल्यात घेऊन साखर वितळेपर्यंत गरम करावे.

वरील मिश्रण एका ताटात /परातीत ओतावे. त्यात मावेल तेवढा मैदा घालून घट्ट मळावे.

त्याची जाडसर पोळी लाटुन लहान लहान आकारात शंकरपाळ्या कापाव्यात आणि तुपात गुलाबी होईपर्यंत तळुन घ्याव्यात.

१.पाणी वापरुन केल्यास जास्त दिवस टिकतात.

बहिण