"आपण किती वर्षांनी भेटतोय नाही?"
---असं तू म्हटलंस की मी?
मला काहीच आठवत नाही.
---आठवताहेत ते तुझे
प्रेमळ निर्व्याज डोळे---
तीच--सगळ्यांना सामावून घेणारी आश्वासक नजर
---तेच निर्हेतुक हसणं---
तरी मझ्या मनात सल कसला आहे?
सगळ्यांशी असंच वागण्याची
तुझी ही रीत आहे याचा?
कि तुझ्या निर्हेतुक असण्याचा?