...मी पुजारी आहे

तुझ्यातला प्रत्येक तुझा मी पुजारी आहे
तुझ्यावरील प्रेमात मी आजारी आहे..

केसांची बट सावरताना हलका झटका
झटक्यात मारणारी ती शिकारी आहे..

नजर तुझी अशी की भावनांचे कोडे
सहस्र गुपिते लपविणारी ती तिजोरी आहे..

उगाच बसतो शोधत मी चंद्रामध्ये तिला
खुदकन हसतो पाहून हृदयी ती शेजारी आहे..

गेलीस चिरडून हृदय, नि हा रंगलेला महाल
महालातही उरलो लाचार मी भिकारी आहे.

--ऋषिकेश दाभोळकर