ते सूर संपले...!

ते सूर संपले अन्, मागे उरे निशाणी,

स्मरते क्षणोक्षणी का, ती संपलेली कहाणी...

        तू मला दिलेले, जे जीवनी पुरावे,

        चार दिसांचे सुख ते, दुःख देऊनी पळावे...

 ऋणी तरी तुझी मी, फ़िटतील कशी ती देणी,

ते सूर संपले अन्, मागे उरे निशाणी...

         रोजची रात्र येई, उद्वीग्न तारकांची,

         रवि रोजचा घेऊन येई, तिरीप वेदनांची...

का संपली तुझ्या कंठीची ती, मधूर रसाळ गाणी,

ते सूर संपले अन्, मागे उरे निशाणी...

         जनात राहते मी, साऱ्यांसवे हसून,

         कंठिते शांत रात्र, तुज मानसी वसवून...

रडते उशीत मी का, नयनी येई पाणी,

ते सूर संपले अन्, मागे उरे निशाणी...!!