उपासाचे पॅटीस

  • पारी साठी: ४ उकडलेले बटाटे, २ चमचे राजगीर/शिंगाड्याचे पीठ,
  • चवीनुसार तिखट, मीठ
  • सारण: १ वाटी खवलेला नारळ, १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर,
  • १ चमचा चारोळी, चवीनुसार बारीक चिरलेली मिरची, लिंबु, मीठ, साखर,
  • घोळायला राजगीऱ्याच्या लाह्या
३० मिनिटे

उकडलेला बटाट किसून घ्या. त्यात पीठ, मीठ व तिखट टाकून गोळा मळून घ्या. सारणाचे सगळे जिन्नस एकत्र कालवून घ्या. बटाट्याच्या गोळ्यात सारण भरून पॅटीस बनवून घ्या. राजगीऱ्याच्या लाह्यात घोळवून, तव्यावर थोडेसे तेल टाकून सोनेरी रंगावर भाजून घ्या किंवा तेलात तळून घ्या किंवा ८ मि. ग्रील करा. चटणी बरोबर गरम गरम खा.

 उपासालाच केले पाहीजे असे नाही, एरवीही चहा बरोबर चांगले लागतात.

स्वप्रयोग