आवर.. भिजतेय तुझी थरथरणारी पापणी

बाजार पीडीतांचा

भेदरलाय किंचाळ्यांनी

कुस्करेल्या फुंलानी

कुरतडलेल्या कंळ्यानी

वेदनांच्या इथे

गोणीच्या गोणी

जखमांचा भाव

वधारला कोणी

का दु:खाची तुझ्या

झिरपतेय निशाणी

टपलेयेत इथे

बनवण्यास कहाणी

आवर.. भिजतेय तुझी

थरथरणारी पापणी

इथे विकलं जातं

डोळ्यातलं पाणी

@ निकीता