कोजागरी पौर्णिमा

उद्या २५ ऑक्टो २००७ म्हणजे कोजागरी पौर्णिमा !!!  आश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागरी पौर्णिमा.ह्या पौर्णिमेला अजूनही बरीच नावे आहेत...कुणी शरद पौर्णिमा म्हणते..कुणी कौमुदी पौर्णिमा...चंद्र आपल्या सौम्य प्रकाशात सगळ्या प्रुथ्वीला न्हाऊ घालतो.

आठवली ना गाणी, गप्पा, मस्ती आणि आणि काय बरे... मसाला दूध-- मज्जा असायची की नाही लहान असताना.माझी आक्का सांगायची की हया दिवशी लक्ष्मी व इंद्र-ऐरावताची पूजा करतात.मध्यरात्री दुधाचा नैवेद्य दाखवून पूजा करतात.पौर्णिमेचा चंद्र कित्ती सूंदर असतो नाही.

कोजागरी पौर्णिमेची एक गोष्ट ऐकीवात आहे..एकदा एक राजा आपले सगळे वैभव्य आणि संपत्ती गमावून बसतो.त्याची राणी महलक्श्मीचे व्रत करते आणि लक्श्मी देवी प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद देते आणि त्या राजाचे वैभव त्याला परत मिळते.

पण ह्या दिवशी जागरण का करतात...ह्याची ही एक गंमत आहे..

असं म्हणतात की महालक्ष्मी मध्यरात्री या चंद्रमंडलातून उतरून खाली पृथ्वीवर येते. ती चांदण्यांच्या प्रकाशात "अमृतकलश' घेऊन प्रत्येकालाच विचारते, की "को जागर्ति...? को... जागर्ति...?' म्हणजे आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे का? कुणी जागं आहे का? अन् तिच्या हाकेला साद देण्यासाठी सगळेच जागे राहतात. मग तिची वाट पाहणाऱ्या, साद देणाऱ्या सगळ्यांना ती "अमृत' म्हणजे लक्ष्मीचं वरदान देते, धनधान्य, सुखसमृद्धी देते. कोजागरीचं शीतल चांदणं अंगावर घेतलं, की मनःशांती, मनःशक्ती, उत्तम आरोग्य लाभतं. सारं जग जरी झोपलं तरी बुद्धिमान, विचारी, संयमी अन् आपले कर्तव्य चोख बजावणारे लोक जागे राहतात.

पौर्णिमेच्या रात्री दूध पिण्यामागेही एक विशिश्ट कारण आहे...शरद रुतुमध्ये हवामानात बरेच बदल घडून येत असतात..एकीकडे उन्हाळा संपत असतो आणि दुसरीकडे हिवाळा सुरु होत असतो.दिवसा गरम आणि रात्री थंडी पडते.दूध पिल्यामुळे पित्त प्रकोप कमी होतो..

सगळ्यात उत्साहाने साजरा करण्यात महाराश्ट्रात आणि गुजरातमध्ये.

ह्यातला थोडासा भाग "गुगलींग" करुन घेतला आहे.