नार्सिसस

खिडकीशी बसून मी बाहेर बघत आहे.
पाहतो आहे प्रतिबिंब माझे
काचेपलीकडून आत बघणारे
कोणते वास्तव, कोणते आभास ?
की खिडकी हेच एकमेव सत्य आहे
दोन भासांमधील ?
वा तुरुंग दुभंगलेल्या एकलाच्या
आत्ममग्न अस्तित्वाचा ?
की रोव्हलिंगच्या पुस्तकातील आरसा
ज्यात मला मीच दिसतो आहे ?
मी - नार्सिससचा खरा वारसदार