-सर्वांनाच हवं असतं आपलं हक्काचं आकाश
उडायचा मोह असला-नसला तरीही..
मलाही मिळालयं माझं स्वतःचं आकाश...
क्षितीजाच्या रेषा रुंदावत उडतांना,
जमीनीची आठवण न येऊ देणारं माझं गुणी आकाश!
पण आता-
त्या मऊ मऊ ढगांच्या हातांना धरून सांगवसं वाटतं- "पुरे आता!"
तुझ्या मायेने पुष्ट माझे पंख पसरून
-होईन मी आकाश!
नाही पडू देणार दुःखाचा टिपूसही जमीनीवर,
- तुझ्याचसारखं!
- चिन्नु