रानोमाळ

ते डोळे बोलके
नजरा त्या चंचल
भिरभिरती कुठेतरी
रानोमाळ...

मोठी सावली त्याची
मोठाच विश्वास तिचा
जातात दूरवर
रानोमाळ...

तो अकाली पडतो
म्हणून तो पाऊस
सरसरतो क्षणभर
रानोमाळ...

ओठ तिचे ओले
मग नजर बोलते
प्रेमाचा संवादु सुरू
रानोमाळ...