उतारवयातील एकाकीपणा

संजय आणि सुलक्षणा, एक आनंदी जोडपे. १० वर्षे आनंदाने संसार केला. २ मुली आणि १ मुलगा झाला. १० वर्षानी अचानक सुलक्षणाला काही असाध्य रोग झाला. संजयने ८ वर्षे जमेल त्या मार्गाने खूप पैसा खर्च करून उपचार केले पण काही उपयोग झाला नाही. सुलक्षणा गेलीच. मुले लहान होती म्हणून संजयने दुसरे लग्न न करता स्वतःच मुलाना मोठे केले, नोकरी आणि घर सांभाळून त्यांची शिक्षणे पूर्ण केली. मोठ्या मुलिचे लग्न केले. दुसरी दोन मुलेही शिकून मार्गाला लागली. आता त्याला एकटेपणा जाणवू लागला, म्हणून त्याने एक जोडिदार शोधण्याचे ठरविले. त्याच्याच परिस्थितितून गेलेली एक स्त्री त्याच्या संपर्कात आली. पण मुले घरखर्चाचा वाटाही उचलायला तयार नाहीत. ती स्वतःतच दंग आहेत. ती व्यक्ती मुलांची जबाबदारी उचलू इच्छित नाही पण संजयबरोबर रहायला तयार आहे. पण संजय संभ्रमात पडला आहे कारण समाजाची मानसिकता.

हेमामालिनिने विवाहित पुरुषाशी विवाह करूनही स्बतःची प्रतिष्ठा जपली म्हणून वृत्तपत्रातून तिचे  कौतुक करणारे लेख आले तरी संजयने मुलाना सोडून तिच्याबरोबर रहायचा निर्णय घेतला तर हाच समाज त्याला एक सामाजिक कलंक समजेल.

तुम्हाल काय वाटते?