झी मराठी - कुठे बघावे माहितीजालावर?

मी सध्या यु.के. मध्ये आहे. मला एक सन्केतस्थळ माहित आहे झी मराठी बघण्यासाठी http://www.planetvu.com/ पण हे संकेतस्थळ सध्या खूपवेळा बंद असते. मी ह्या संकेतस्थळाचा सभासदही झालो होतो, पण सध्या बरेच दिवस बंद असल्यामुळे एपिसोडस बुडतायत. गूगलवर खूप शोधल, पण दुसरे कुठलेही संकेतस्थळ सापडले नाही. कुणाला अशा प्रकारचे दुसरे संकेतस्थळ माहीत आहे का, जिथे क्रेडिट कार्ड वरून पैसे देऊन झी मराठी संगणकावर बघता येईल?