एजीओजी

दीपावलीचे निमित्त साधून सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहितीस्रोतांचा भारतीय भाषांत संचय करण्याकरता, बहुभाषिक सोई असलेले नवे संकेतस्थळ एजीओजी सुरू झाले आहे.

सध्या या संकेतस्थळाची जडणघडण चालू आहे. येत्या पंधरवड्यात विकीपिडीया नुसार सार्वजनिक व्यासपीठावर नव्या सोई उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. यात भारतातील विविध प्रांतांची भौगोलिक, ऐतिहासिक, पर्यटनविषयक, सांस्कृतीक ( आहर , पोशाख, राहणीमान, सण, उत्सव इ.) , व्यावसायिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, साहित्यिक इ. बाबींबद्दलच्या माहितीचा प्रामुख्याने समावेश असेल. उपलब्ध होणारी माहिती त्या त्या भाषेत अनुवादित करण्याचे काम सदस्य करतील अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे लेखांमधील त्रुटी दूर करणे, बदल करणे, माहितीचे नियोजन आणि मांडणी अशी सर्व कामे ही सर्व सदस्यांना करता येतील. गमभनमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व लिप्यांचा ( देवनागरी, गुजराती, गुरुमुखी, बांगला, मल्याळम, तेलुगु, कन्नड, उर्दू) वापर याकामी या संकेतस्थळावर करता येईल.

या संकेतस्थळाबद्दल आपली मते, सुचवण्या, समीक्षा, कल्पना आणि आपला सहभाग यातून संकेतस्थळाचा विकास आणि वृद्धी व्हाही याकरता हा लेखनप्रपंच.

दीपावलीच्या सर्वांना अनेकोत्तम शुभेच्छा.

Logo

- ॐकार जोशी