मलिदा

१२ लाखाचे पेरू कोणी खाल्ले?

सदनिका महापलिकेच्या, भाडेकरू नगरसेवकांचे

राष्ट्रकुल स्पर्धेच्या मलईसाठी विकासकामांचा खेळखंडोबा

आता तलाठीच झाले इस्टेट एजंट 

आपण हे वाचलं ना?

"जगाच्या पाठीवर"ची नायिका म्हणते-"थकलें रे नंदलाला."

हे पक्षातीत आणि सरकारी लाचखाऊ काय म्हणतात?--वाचा

मलिदा कधिचा खात राहिलो,

"काप" घेत बसलो,

कधिही नाही आम्ही दमलो-----धृ----

खाते अमुचे असो कसेही,

राजपत्री वा आणखी काही,

सरकारची सेवा करतांना

हडपणेंच शिकलो,

कधिही नाही आम्ही दमलो----१---

पंचायती वा जिल्हा परिषदि,

नगरपालिका, छावनींतही,

कुठे जरीं वावरलो आम्हीं,

कुणां नाही धकलों

कधिही नाही आम्ही दमलो ----२---

राजकीय तो अनुनय करितां,

त्यांतुनी घडतो "प्रगल्भ "नेता,

धनराशींच्या उखळामागें,

कसेंकसें पळलों

कधिही नाही आम्ही दमलो----३---

नगरसेवकी, आमदारकी,

खासदारकी आम्हां न परकी

कटिचें सोडून  शिरीं बांधलें,

निलाजरे बनलो,

कधिही नाही आम्ही दमलो----४---

चटणी भाकरी त्याज्य आम्हाला,

सदैव "भूखंडा" वरती घाला,

मढ्याटाळुचे  लोणी ,आम्हीं

खावयास चटलो

कधिही नाही आम्ही दमलो----५---

आम्हा हवा तो काळा पैसा,

परमप्रीतिचा सखाच जैसा,

सततही त्याचा ओघ वहावा,

यास्तवही झटलो,

कधिही नाही आम्ही दमलो----६---

अवचित कुणितरि, हाणी काठी

वकिलांची मग फौजही पाठी,

चोराची उलटी ती बोंबही,

माराया शिकलो,

कधिही नाही आम्ही दमलो----७---

सजीव व्यक्ती, निर्जिव वस्तू,

सर्वां लुटुनी बांधू वास्तू,

प्रमुख आमुचा म्हणें "तथास्तु"

"बापू" ना हसलो

कधिही नाही आम्ही दमलो----८---