लपंडाव
तू नसताना
आठवणींचे मेघ दाटून येतात आभाळभर
ओथंबून आलेलं हे अस्मानी स्वप्न
छळत राहत मनाला क्षण न् क्षण
तू आल्यावर
बरसतात हेच मेघ धुंद होऊन
भरभरुन कोसळणाऱ्या या आनंदसरींत
चिंब चिंब नाहतं आसावलेलं मन
आणि तू गेल्यावर---
सुरु होतो श्रावणाचा खेळ
अनंतकाळ चालणारा---!
-मुक्ता