आनंद, अत्यानंद आणि अंत

सूचना : पूर्ण वाचल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढू नये.... :-)

एक होता आनंद आणि त्याचा मित्र अत्यानंद.

दोन्ही एकदा भेटले. भेटल्यावर त्यांचा कार्यक्रम ठरलेला. दारू सिगारेटी पिणे. दारुचे तीन चार ग्लास आणि सिगरेटी पिऊन झाल्यावर आनंद म्हणाला,

" हे अत्यानंदा, हे बघ, तुला सांगतो स्पष्ट,

ऐकायचे थोडे घे कष्ट.

दारू करीते बुद्धीला भ्रष्ट

आणि करीते आपल्याला नष्ट."

अत्यानंदाचा पाचवा ग्लास पिऊन झाला होता.

तो म्हणाला,

" मित्रा, आनंदा!

 तू हे जे सांगतो आहेस, ते मला नाही रे पटत.

ही दारू आहे ना, ती नाही कधी सुटत!"

अचानक झाली दरवाज्यावर ठक् ठक् !!

आणि आत आली एक ललना, तिच्या हातात होत्या आणखी काही दारूच्या बाटल्या !

ते पीत गेले. ती देत गेली.

शेवटी दोन्ही गेले. जग सोडून.

तर, आता पात्र परिचय !

त्या ललनेचे नाव: कुमारी. मृत्यूलता

आणि दरवाज्याबाहेर मोठ मोठ्याने आणखी एक स्त्री हसत होती.

तीचे नाव होते: कुमारी. व्यसनाधीनता.

तीनेच तर त्या दोघांकडे मृत्यूलतेला पाठवले होते.

कारण तीची आणि त्या दोन मित्रांची आताशा खूप जवळीक झालेली होती........