तव्यावरचा शेंगदाणे-मिरचीचा झटपट ठेचा.

  • सात-आठ मिरच्या
  • मूठभर शेंगदाणे
  • लसणाच्या चार-पाच पाकळ्या
  • जीरे
  • दोन चमचे तेल
  • कोथिंबीर, मीठ
१५ मिनिटे
  • प्रथम मिरच्या स्व्च्छ धुवून बारिक चिराव्यात.
  • लसूण पाकळ्या चिराव्यात.
  • तव्यावर तेल टाकून, प्रथम शेंगदाणे टाकावेत. नंतर, मिरच्या, लसूण टाकावेत.
  • ते भाजले गेल्यावर, ते मिश्रण बाजूला सारून, तव्याच्या मध्यभागी तेल टाकावे. त्यात जीरे व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
  • मग ते सगळे मिश्रण एकत्र करावे. जीरे शेवटी टकल्याने ते जळत नाही.
  • मग मीठ टाकून त्याला जाडेभरडे ठेचावे.
  • हवं असल्यास त्यावर लिंबू पिळू शकतो.

तोंडी लावायला अगदी चवदार !!

मिक्सर वापरू नये. ठेचलेलाच छान लागतो.

मी स्वत: