नंदिग्राम व आसाम मधील हिंसा!!

सेझ मुद्द्यावरून नंदिग्राम मधील रहिवास्यांवर होणारा अत्याचार हा लाजिरवाणा व देशाला काळिमा फासणारा आहे. निष्पाप नागरिकांवर होणारा गोळीबार, त्यांच्या होणाऱ्या निर्घुण हत्या या संवेदनशील समाजाचा थरकाप ऊडवीत आहेत.या साऱ्या मामल्यात सरकार मात्र हातावार हात धरून स्वस्थ बसले आहे.

आसाम मधील ताजा हिंसाचार हा तर क्रौऱ्याची हद्द होती. आपला हक्क मागणाऱ्या आदिवासींवर स्थानिकान्नी केलेला हल्ला भ्याड व पाशवी होता.

या साऱ्या घटना आपल्या समाजातील संवेदनशीलता कमी वा संपत चालल्याच्या निदर्शक वाटतात. कायद्याविषयीचा आदर व भीती तर केव्हाच नामशेष होत आहेत. समाज कायदा हातात घ्यायला आता कचरत नाही तर सरकार आपली दडपशाही चालू ठेवत आहे. या घटना बघून आपण आपला हक्कांसाठी लढा दिला तर आपल्याला दडपणाऱ्यांची फौज या देशात हजर आहे. कुणी आपला हक्क शांततेने मागू शकत नाही? तो हक्क त्यांना द्या अथवा न द्या पण त्यांच मागणं तरी ऐकून घ्या.

या घटनांवर आपल्याला काय वाटते?