आयुष्य

पांढरट काळ आकाश

सुर्यतेजान तरीही स्वच्छ

पक्षांचा किलबीलनारा थवा

मध्येच घारेच उडन यथेच्छ

विस्कटलेले सैरभैर जिवन

सारिच नाती फ़ोल

भावनाही काहीश्या वरवरच्या

दुख मात्र खोल

क्षितीजेच्या वाटेवर मनही असच

सुख दुख, विचार-अविचार

सत्य असत्यांचे काळे पांढरे ढग

तरीही जिवनभरारी घेत घारीसारखा संचार

जिवघेण्या कर्णकर्कश आरोळ्यान्मध्ये

सुखपक्षांचा मधूर आवाज

स्वछंद हेलकावनार मन म्हणजे

क्षितीजापलीकडची जहाज..........