इतके नका भरवू की
तडस लागून राहील
इतके नका पाजू की
उचकी लागून राहील
इतके नका चेपू की
डोके हवेत जाईल
इतके नका चोपडू की
पोपडा पडून जाईल
इतके नका चिडवू की
मजाच निघून जाईल
इतके नका रडवू की
पाणी आटून जाईल
इतके नका पिदवू की
डोळ्यात रक्त येईल
इतके नका जगवू की
प्राण कंटाळून जाईल!