दिवा अन्तर्मनीचा

तळहाताच्या रेषान्मधल्या,
गर्दीमधुनी काढुन वाट
काळ सान्गतो निरोप हरीचा
'नित्य घडीचा - नित्य प्रवास'

अन्तर्मनीचा दिवा जागता,
पेट घेऊनि जळती ताप
लख्ख झळकल्या दाही दिशा या,
मिणमिणलेली विझवून वात

ओढून घेई नीरव खोली,
निळ्या कणान्चा पूर जिथे
तरन्गुनी मन नाचत गाते,
ना छाया ना ऊन तिथे

अनोळखी हे द्रुश्य तरिही,
लोभ जिवाला पुन:पुन्हा
सन्ग तुझा रे सख्या सावळ्या,
हवा निरन्तर मुग्ध मला

तारुन झुलती जीवन नौका,
तुच नेई बा पैलतीरा
चुका अनन्वित घालुन पोटी,
मार्ग दाखवा दयाघना

भुजन्ग मनिचा जागा होता,
दोले सहजी सळसळ साप
बरबटलेली त्वचा सान्गते,
येवो शुचिता टाकुन कात

शुचिता