तुझ्या आठवणींच्या अल्बममधून
आठवतोय का बघ
एक छोटासाच क्षण
आणि त्यावेळचं त्यातलं ते मन
या सरळ चाललेल्या जीवनात
तो इथेच कुठेतरी आहे
डोळे मिटल्यावर कधी शांतपणे
डोळ्यांसमोर उभा तो राहिल
जेंव्हा निघू लागतील तुझे
आठवणींच्या कोपरॅतील
क्षण असंख्य असे छोटे छोटे
जे कधी होते तुझे,
रोजचेच बापडे आपले
काही वेगळं महत्त्व नसलेले;
तेंव्हा तुला ते
वाटतील रमणीय
दूर कुठेतरी क्षितीजावर दिसेल
पाऊलखुणांचे इंद्रधनुष्य तुला
जे चालताना ना भासले सुंदर
नकारार्थी असलेल्या तुला
अशावेळी तेंव्हा वाटेल तुला,
‘अरे आपण तर खूप जगलो!’
-रोहन जगताप
‘सकाळ’ मधील एका काव्यलेखनस्पर्धेसाठी पाठवलेली कविता.
http://marathidesh.blogspot.com/