तुझ्या आठवणींचे सल...

तुझ्या आठवणींचे सल...

तुझी वाट सुनी सुनी,
तशी ती खूपच जुनी..
तरीही आज लांब लांब वाटतेय,
चालताना ती, मग उगाच
आठवणीने तुझ्या पापण्यांत दवं साठतंय...

तुझी कहाणी माझ्या मनोमनी,
वाचतो मी मोठ्या आवडींनी,
तरीही ती आज खूप मोठी वाटतेय
वाचताना ती, मग उगाच
शब्दा शब्दात आठवणीचा पान्हा फुटतोय..

तुझं गाणं माझ्या वचनी,
गुणगुणतो मी माझ्या सवडींनी,
तरीही ती आज मला गझल वाटतेय,
गुणगुणताना ती, मग उगाच
मैफिलीत माझ्या सुन्याचे तरंग उधळतेय..

तुझा चेहरा माझ्या नयनी,
पाहतो त्याला मी चोरूनी,
तरीही तो मला आज उदास आरसा भासतोय,
पाहताना त्याला, मग उगाच,
माझे प्रतिबिंब मी एकांतात रडताना पाहतोय...

-- आ..आदित्य