मनोगतवर सध्या 'नवीन कविता', या सदराखाली असलेली,‘मी जाणतो’ ह्या मझ्या कवितेचे मनोगत.
या अशाच जाणारॅ दिवसात, मनाला त्याची फारशी जाणीव नसते. मन इथेच आसपास काही बघत असतं, डोळ्यांनी. (कधी कधी डोळे मिटल्यावर त्याला आपल्या अस्तित्त्वाची जाणिव होते.)
एकदा आई मला म्हणाली,‘इतका सुंदर सोन्यासारखा दिवस आहे, कशाला वाया घालवतोस? कर, काहीतरी कर.’ (मी मनात म्हटलं,‘ हो आई मी जाणतो, सुंदर सोनेरी सुर्यकिरणांत उजळून निघणारे दिवस.' जे चराचराला रोज काही कर म्हणतात... नाविन्याच्या तेजाने या सृष्टीतलावर अवतीर्ण होऊन, पाना-फुलांना, फुलपाखरांना आणि त्यांच्या इतक्याच कोमल मनाला आशा आणि नवचॆतन्य देणारा ‘सोनेरी सूर्यकिरण’.)
नंतर ती एकदा मला कॊतुकाने म्हणाली,‘खुप खुप मोठ्ठा होऽ’ ( खरंच मी जाणतो, तुझी माझ्यावरील मोठ्ठी माया... आणि माझं जीवन सुखी व्हावं यासाठी असलेली तुझी तळमळ.)
(मला केवळ जाणायचं आहे की, ह्या जीवनापलीकडे काय आहे? असेच सुंदर सोनेरी सूर्यकिरण की आईची माया?...)
मी शाळेमध्ये असताना अनेक भाषणांमधून ऎकलं आहे,‘मरावे परी किर्तीरूपी उरावे...’ (मी जाणतो, न थांबणारॅ ह्या काळातून होणारा आठवणींचा प्रवास...) ,आणि अशाच कार्यक्रमांत मी कितीतरी वेळा ही सुचना ऎकली असेल,‘मुलांनो शांतता पाळा.’ ( मी जाणतो, ओठ मिटवताच होणारी शांतता ‘ह्या जीवनातली’)
(मला केवळ जाणायचं आहे, ह्या जीवनापलीकडे काय आहे? ‘माझ्या स्वतःच्या’ आठवणी... ज्या केवळ मीच जाणतो... की, खरी ‘शून्य’ विचारांची शांतता? )
-रोहन जगताप
माझे सर्व लेख वाचा-
दुवा क्र. १
माझ्या सर्व कविता वाचा-
दुवा क्र. २