रामरायाचा धडाही सार्थ होता
जानकीचा जरी पुकारा व्यर्थ होता
सुरू नव्हती तिथे त्यांची हो धटाई
माणसांच्या कायद्याला अर्थ होता
युद्ध जरी ते पेटलेले शेवटाचे
माधवाचे ऐकण्याला पार्थ होता
श्वास फक्त घेतलेले नाव घ्याया
एवढासाही जरासा स्वार्थ होता
गाजले तेही जरासे चाळू म्हटले
नेहमीचा कोरडा विद्यर्थ होता