ओझे मणामणाचे वाहीत चाललो मी
मी सभ्य हे जगाला सान्गीत चाललो मी
माझ्या भलेपणाची शंका कुणा कशाला
त्यांच्या पुढेच माथा टेकीत चाललो मी
माझे असे स्वतःचे थोडे असेल काही
त्यांना खुशाल संधी ठेवीत चाललो मी
त्यांचा विचार केला त्यांच्या सवेच मीही
बाजूस प्रश्न माझे टाकीत चाललो मी
माझ्या पराभवाला मिरवीन यापुढेही
विजयात तथ्य नाही मानीत चाललो मी