तू मला...

हा आला तो गेला
ही आली ती गेली
वाट बघून वाट थकली
पण तू नाहिस दिसली
    आवाज आले आवाज गेले
    मन मनात बोलून गेले
    बघ सर्वत्र शांतता दाटली
    पण तू नाहिस दिसली
भुंगा दिसला, फुलपाखरू दिसले
फुलांवरती खेळून गेले
फुलही बघ फुलून थकले
पण तू नाहीस दिसली
    धडधडून हे हृदय थकलं
    डोळ्यात माझ्या पाणी आलं
    या पाणवलेल्या डोळ्यांनीही
    तू मला नाहीस दिसली
क्षणिक जीवन प्रवासावर
माझा मुळीच विश्वास नाही
म्हणूनच वाटतं यावंस...
तू इथं एकदा तरी
अणूरेणूंमध्ये विश्वातल्या
खरंच माझंही एक विश्व आहे
तू केवळ दोन क्षणांसाठी तरी
कधी तिथं येऊन जावंस...

रोहन जगताप
दुवा क्र. १

इतर कविता
दुवा क्र. २

इतर लेख
दुवा क्र. ३