वांग्याचं भरीत

  • १ मोठं काळं वांगं
  • १ मोठा कांदा, २ हिरव्या मिरच्या, १ टोम्याटो
  • ५-६ लसूण पाकळ्या, १ वाटी कोथींबीर, कढीपत्ता
  • शेंगदाण्याचं कूट, लाल तीखट, दही, मीठ, तेल
३० मिनिटे

वांग्याला तेल लावून गॅसच्या आचेवर (किंवा बंद भांड्यात) नरम होई पर्यंत सगळ्या बाजूने भाजून घ्यावा.   भाजून झाल्यावर वरील काळी साल काढून टाकावी व चमच्याने अथवा वाटीने त्याचा लगदा करून घ्यावा.

कांदा, हिरवी मिरची व टोम्याटो बारीक चिरून घ्यावेत.  लसणाची पेस्ट करून घ्यावी, शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घ्यावं.

आता एका पॅनमध्ये २ टे. स्पून तेल तापवून त्यात प्रथम कांदा, लसणाची पेस्ट, हिरवी मिरची व कढीपत्ता परतून घ्यावा.  कांदा गुलाबी झाल्यावर त्यात टोम्याटो, वांग्याचा लगदा, शेंगदाण्यांचं कूट, थोडंसं लाल तिखट व चवीनुसार मीठ टाकून पॅनवर झाकण ठेवून ५-७ मिनिटं शिजवून घ्यावं.  शिजल्यावर वरून कोथिंबीर घालवी.

गरम असतानाच खायला द्यावं.  वाढून घेतल्यावर त्यात १ चमचा घट्ट दही घालावं.

दही आवडत नसल्यास नाही घातला तरी चालेल

माहित नाही